दैनिक स्थैर्य । दि.३० एप्रिल २०२२ । सातारा । सातारा तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी जुगार सुरु होता. याबाबत स्थानिकांकडून माहिती समजल्यानंतर त्या दोन्ही जुगार अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी सुमारे ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गजवडी फाटा, ता. सातारा गावच्या हद्दीत पत्र्याच्या शेडच्या आडोशाला ऋषिकेश संतोष सांडभोर रा. समता पार्क, शाहूपुरी, सातारा, विशाल राजन गोरे रा. शुक्रवार पेठ, सातारा अतिश बाबू सावंत, रा. सावंतवाडी (लावंघर) ता. सातारा, विकास वसंत किर्तीकर, वय ३९ रा. आरे, ता. सातारा, अलंकार उत्तम सावंत रा. सावंतवाडी (लावंघर) ता. सातारा, चिल्लभा दादू धोदंवडे रा. गजवडी, ता. सातारा, चंद्रकांत रमेश चोरगे रा. रविवार पेठ, सातारा, प्रकाश तुकाराम गळीप, रा. गजवडी फाटा ता. सातारा हे जुगार खेळताना आढळून आले त्यांच्याकडून ८६ हजार १८५ रुपये किंमतीचे जुगाराचे साहित्य रोख रक्कम व सहा मोबाइल हस्तगत करण्यात आले. दुसऱ्या घटनेत सातारा येथील मल्हारपेठ परिसरात असणाऱ्या एका मंदीराच्या आडोशाला प्रमोद पांडूरंग कांबळे, रा. खेड नांदगिरी, ता. कोरेगाव आणि अन्य एक जण जुगार घेताना आढळून आला. त्यांच्याकडून १ हजार २७५ रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य रोख रक्कम व एक मोबाइल जप्त करण्यात आला.