सरड्यात कत्तलीसाठी नेहेत असलेल्या टेम्पोवर छापा; अकरा लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त; फलटण ग्रामीण पोलिसांची कारवाई


दैनिक स्थैर्य | दि. 12 ऑक्टोबर 2021 | फलटण | सरडे ता. फलटण येथील गफूर हुसेन शेख, वय 42, सुलेमान गफुर शेख, वय 27 वर्ष दोघे रा. सरडे ता. फलटण यांनी गोवंशीय जातीची 17 लहान खोंडे दाटीवाटीने कोणतीही परवानगी नसताना कत्तलीसाठी डांबून ठेवलेली फलटण ग्रामीण पोलिसांना मिळून आली. सदर कारवाई मध्ये एक लाख 70 हजार किमतीची 17 जर्सी गायीची खोंडे, पाच लाख रुपये किमतीचे दोन पिकअप असे एकूण अकरा लाख 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या बाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार एन. ए. टिळेकर करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!