दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑक्टोबर २०२१ | फलटण | सासपडे (ता.सातारा) येथे चोरट्या दारूविक्री अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी बुधवारी कारवाई केली.यावेळी सुमारे ७,८०० रुपये किमतीच्या १३० देशी दारूच्या बाटल्या जप्त केली आहे.याप्रकरणी सुधाकर मुरलीधर कमाणे( वय.३५,रा.सासपडे,ता.सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी सासपडे येथे सुधाकर कमाणे हा राहत्या घराच्या आडोश्याला चोरून देशी दारू विक्री करत असल्याची माहिती सपोनि डॉ.सागर वाघ यांना मिळाली.यावेळी हवालदार प्रवीण शिंदे,विशाल जाधव,विजय साळुंखे व महिला पोलीस तेजस्विनी जाधव यांनी दुपारी सासपडे येथे छापा टाकला.
यावेळी सुधाकर कमाणे हा अवैधरित्या दारू विकत असताना पकडले.त्याच्याजवळून देशी दारूच्या ७,८०० रुपये किमतीच्या १३० बाटल्या ताब्यात घेतल्या.या घटनेचा पुढील तपास हवालदार राजू शिखरे करत आहेत.