साताऱ्यात जुगार अड्डयावर कारवाई


दैनिक स्थैर्य । दि. २० मे २०२२ । सातारा । सातारा व शहर परिसरात जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती स्थानिकांकडून समजली. यानंतर पोलिसांनी त्या अड्डयावर छापा टाकून ३६ हजार ७१० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा येथील समर्थ मंदिर परिसरात असणाऱ्या एका पान टपरीच्या आडोशाला तेथीलच सचिन विष्णू नलवडे, शुभम महेंद्र गंगावणे, अमित विष्णू नलवडे हे तीन जण जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून ३६ हजार १०० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले. दुसऱ्या घटनेत गोडोली ता. सातारा गावच्या हद्दीत पालवी चौकात एका हॉटेलच्या मागे सचिन कृष्णा देशमुख रा. मोरे कॉलनी, गोडोली यांच्याकडून ६१० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले.


Back to top button
Don`t copy text!