
दैनिक स्थैर्य । दि. १९ मे २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातील नागेवाडी गावच्या हद्दीत पारेख पेट्रोल पंपाशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती स्थानिकांकडून समजताच पोलिसांनी छापा टाकून तेथून ४६० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले.