जुगार अड्डयावर कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१४ जानेवारी २०२२ । सातारा ।  येथील मोळाचा ओढा परिसरातील एका दुकानाच्या आडोशाला जुगार सुरु होता. याबाबतची माहिती स्थानिकांकडून मिळताच या जुगार अड्डयावर शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून तिघांवर कारवाई केली. त्यांच्या ताब्यातून दोन हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. याबाबतचा गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आला आहेे.

या जुगार अड्डयावरील कारवाईत निलेश शिंदे रा. शनिवार पेठ सातारा, सागर यादव रा. बसाप्पा पेठ सातारा, नितीन कुराडे रा. करंजे पेठ सातारा अशी पोलिसांनी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. या तिघांना सीआरपीनुसार नोटिसा बजावण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास शाहूपुरी पोलिस करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!