जिल्हा पोलीस प्रमुखांची कारवाई; वड्ज येथील दोघेजण तडीपार


दैनिक स्थैर्य । दि. २९ एप्रिल २०२२ । वडुज । वडुज व म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गर्दी-मारामारीसह दुखापत करणे, शिवीगाळ दमदाटी करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, दुखापत करणे, बेकायदा वाळु चोरी करणे, असे गंभीर गुन्हे करणार्‍या टोळीचा प्रमुख किशोर चंद्रकांत जाधव वय 28, रा. डांबेवाडी, ता. खटाव व त्याचा साथीदार निलेश अशोक जाधव, वय 31, रा. वडुज, ता. खटाव यांच्याविरुध्द वडुज पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांनी हद्दपार प्रस्ताव सादर केला होता. हद्दपार प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी या टोळीस सातारा जिल्हा हद्दीतुन 6 महीने (सहा महीने) कालावधीचा हद्दपारीचा आदेश केला आहे.

या टोळीतील लोकांना वेळोवेळी सुधारणेची संधी देवूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमधुन त्यांचेवर कडक कारवाई करण्याकरीता मागणी होत होती. त्यामुळे त्यांच्याकडून सातारा जिल्हा हद्दीत हिंसक घटना घडून भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होवू नये, म्हणून त्यांच्यावर वरीलप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईच्या सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात अशाच प्रकारे समाजामध्ये दहशत पसरविणार्‍या, समाजात बेकायदेशीर कारवाया करणार्‍या टोळ्यांचे विरुद्ध तडीपारची कारवाई सुरु आहे. जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बंसल यांनी जिल्हयाचा कार्यभार स्विकारले पासुन 34 प्रस्तावातील बेकायदेशिर कारवाया करणारे 132 इसमांना हद्दपारीचे आदेश केलेले आहेत. या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाचे वतीने अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पो. ना. प्रमोद सावंत, पो. कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस यांनी योग्य पुरावा सादर केला. या कारवाईचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.


Back to top button
Don`t copy text!