कर्नाळा बॅंकेतील गैरव्यवहारातील दोषींवर कारवाई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २२ ऑगस्ट २०२२ । मुंबई । पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील गैरव्यवहाराबाबत सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येत आहे. या गैरव्यवहारातील प्रत्येक संचालकांचा सहभागाबाबत तपासणी सुरू आहे. दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील गैरव्यवहाराबाबत अध्यक्ष विवेकानंद शंकर पाटील यांना अटक करण्यात आली आहे. बँकेवर सध्या अवसायकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पाच लाख रुपयांच्या आतील ठेवीधारकांना पैसे परत देण्यात आले आहेत. बॅंकेची स्थावर मालमत्ता आणि संचालक पदाधिकारी यांची स्थावर मालमत्ता, बॅंक खाती जप्त करण्याचे आदेश निर्गमित करण्यासाठी अपर पोलीस महासंचालक यांचा प्रस्ताव गृह विभागास मिळाला आहे. याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही सुरू आहे. उर्वरित संशयितांविरुद्ध पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे, असे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!