विनापरवाना पुतळा प्रकरणी एकावर कारवाई


दैनिक स्थैर्य । दि. २८ नोव्हेंबर २०२१ । सातारा । राजवाडा परिसरातील अजिंक्य रिक्षा स्टॉप जवळ देव माणूस डॉ. अजितकुमार देव यांचा पुतळा विनापरवाना, वाहतूकीस अडथळा तसेच नागरिकांच्या जिवीतास धोका होईल अशा पद्धतीने लावल्यामुळे पोलिसांनी एकावर कारवाइ केली.

याबाबत हवालदार विश्वनाथ वसंत मेचकर यांनी फिर्याद दिली आहे. अजिंक्य रिक्षा स्टॉप परिसरात शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास डॉ. अजितकुमार देव यांचा काल्पनिक पुतळा बसविला असल्याची माहिती हवालदार मेचकर यांना मिळाली. त्यानुसार ते अन्य कर्मचाऱ्यांसोबत तेथे गेले. चौकशीमध्ये हा पुतळा एका खासगी वाहिनीचा मालिकेच्या प्रमोशनसाठी आणल्याचे समोर आले. हा पुतळा कोणत्याही परवानगी शिवाय तसेच कोणत्याही आधराशिवाय तसेच वाहतूकीस अडथळा होईल असा लावण्यात आल्यामुळे हवालदार मेचकर यांनी एकावर कारवाइ केली.


Back to top button
Don`t copy text!