सासकलच्या माजी ग्रामसेवकावर कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 01 ऑक्टोबर 2021 । फलटण । मौजे सासकल (ता.फलटण) येथील गैरव्यवहार व कामातील अनियमिततेविरोधात सासकल जनआंदोलन समितीने केलेल्या तक्रारीवर झालेल्या चौकशीनंतर तत्कालीन ग्रामसेवक अंगराज खशाबा जाधव यांच्यावर एक वर्षांसाठी वेतन वाढ थांबवण्याची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जनआंदोलन समितीने दिली.

दरम्यान, सदर तक्रारींसदर्भात चौकशी समितीने दिलेला अहवाल दिशाभूल करणारा असून या अहवालात तत्कालीन ग्रामसेवक अंगराज जाधव व तत्कालीन सरपंच सौ.लता विकास मुळीक यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे आणखीन कडक कारवाई होण्याकरिता उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांच्याकडे अपील करण्यात येणार असल्याचे जनआंदोलन समितीचे अध्यक्ष शिवाजी हरिबा मुळीक, उपाध्यक्ष विनायक नारायण मदने, सल्लागार भानुदास दिनकर घोरपडे, प्रवक्ते सोमनाथ घोरपडे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!