दोन लाखाचा खोटा चेक देवून फसवणूक; आरोपातून निर्दोष मुक्तत्ता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ११ सप्टेंबर २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील तरडगाव येथील विजय नामदेवराव गायकवाड यांनी तरडगाव येथील सराफी दुकानदार तात्यासाहेब बापूराव सुरवसे यांचे विरुध्द दोन लाख रुपये लाखाचा खोटा चेक (न वटणारा चेक) देवून फसवणूक केल्या संदर्भात चलनक्षम दस्ताऐवजाचे कलम १३८ अंतर्गत फलटण न्यायालयात खटला दाखल केलेला होता. तात्यासाहेब सुरवसे यांचे विधिज्ञ यांनी सदरचा चेक हा सावकारीचे व्यवहारातून फिर्यादी विजय गायकवाड यांनी सुरवसे यांच्याकडून घेतलेला होता व सुरवसे यांनी सदरील फिर्यादी विजय गायकवाड यांची संपुर्ण रक्कम व्याजासह परत केलेली असताना देखील ज्यादा पैशाच्या लोभाने सिक्युरिटी म्हणून घेतलेल्या चेकचा गैरवापर केलेला असल्याचे पुराव्यानिशी सिध्द केले. त्यामुळे फलटण येथील प्रथम वर्ग न्यायधिश श्रीमती एस. आर. बडवे यांनी आरोपी तात्यासाहेब सुरवसे यांची चलनक्षम दस्ताऐवजाचे कलम १३८ मधून निर्दोष मुक्तत्ता केली. सदरील खटल्याचेकामी आरोपी तात्यासाहेब सुरवसे यांचे फलटणवतीने फलटण येथील नामांकित वकील ॲड. जावेद मेटकरी यांनी काम पाहीले

फिर्यादी विजय नामदेवराव गायकवाड यांचे फिर्यादी प्रमाणे सुरवसे यांचेवर झालेल्या कर्जाचे निवारण करणेसाठी त्यांना वेळोवेळी रक्कम दोन लाख रुपये फिर्यादी यांनी दिलेले होते व सदरील रक्कमेच्या तारणापोटी सुरवसे यांचे नावे असलेल्या सिटी सर्व्हे नं. २२१ क्षेत्रफळ १०१.०० स्के.मी. ही मोकळी जागा तारण गहाणखत करुन घेतलेली होती. सदरील तारण गहाणखताची मुदत संपल्यानंतर फिर्यादी यांनी आरोपी सुरवसे यांना पैशाची मागणी केली असता आरोपीने त्यांचे खाते असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा तरडगाव या बँकेचा दोन लाख रुपयेचा चेक दिलेला होता व सदरील चेक खात्यावर भरणेस सांगून रक्कम मिळणेची हमी व खात्री दिलेली होती. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी सदरील चेक त्यांच्या स्वतःच्या खात्यावर भरला असता चेकवरील रक्कमेइतकी रक्कम सुरवसे यांच्या खात्यात शिल्लक नसल्याने चेक न वटता परत आला. अशा प्रकारे सुरवसे यांनी न वटणारा खोटा चेक देवून फिर्यादी विजय गायकवाड यांची फसवणूक केल्याने फिर्यादी यांनी फलटण येथील न्यायालयात चलनक्षम दस्ताऐवजाचे कलम १३८ अन्वये खटला दाखल केलेला होता.


Back to top button
Don`t copy text!