दैनिक स्थैर्य । दि. १२ नोव्हेंबर २०२२ । फलटण । फलटण शहरातील नगरपरिषदेचे आस्थापना विभागात काम करीत असलेल्या आस्थापना विभागामध्ये काम करीत असताना विजय रमेश मारुडा यांनी त्यांचे ऑफिसमध्ये जावून फिर्यादीचा मोबाईल घेवून त्यांचे नगरपरिषदेचे असलेले ऑफिसमध्ये गेला म्हणून फिर्यादी ही त्यांचे ऑफिसमध्ये जावून माझा मोबाईल दे, असे म्हणाली असता आरोपी विजय मारुडा यांनी फिर्यादीस मारहाण करून फिर्यादीचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यामुळे फिर्यादीने विजय मारुडा यांचे विरुध्द अपराध केलेबाबत फलटण शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला होता. या खटल्याचे कामी मे. कोर्टासमोर आलेला साक्षीपुरावा आणि आरोपीचे वकीलांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून फलटण येथील प्रथमवर्ग न्यायाधीश सौ.एस.बी. साबळे मॅडम यांनी विजय मारुडा यांची सदरील खटल्यातून निर्दोष मुक्तता केली, अशी माहिती फलटण येथील प्रसिद्ध वकील ॲड. जावेद मेटकरी यांनी दिली.
याकामी आरोपी विजय मारुडा यांचेतर्फे फलटण येथील फौजदारीतील नामांकित वकील ॲड. जावेद मेटकरी यांनी काम पाहिले.