इन्शुरन्सदेखोकडून वेरकचे संपादन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ एप्रिल २०२३ । मुंबई । इन्शुरन्सदेखो या भारतातील अग्रगण्य इन्शुअरटेकने मुंबई-स्थित एसएमई विमा वितरण कंपनी वेरकचे संपादन केले आहे. सेक्विया व लाइटस्पीडचे पाठबळ असलेली वेरक फक्त १३ महिन्यांच्या कार्यसंचालनांमध्येभारतीय एसएमई विमा क्षेत्रातील प्रभावशाली नाव बनले आहे. यामुळे इन्शुरन्सदेखोचे एसएमई विमा क्षेत्र प्रबळ होईल आणि सूक्ष्म-व्यवसाय विमा क्षेत्रातील त्यांच्या ऑफरिंग्ज विस्तारित होतील.

इन्शुरन्सदेखो संस्थापक राहुल माथूरसह वेरक टीमला ऑनबोर्ड करेल. या अद्वितीय सहयोग-केंद्रित मॉडेलच्या माध्यमातून वेरकने प्रवेश न झालेल्या सूक्ष्म-व्यवसाय विमा क्षेत्रात प्रवेश करत पहिल्यांदाच हजारो लहान दुकानदारांना विमा आश्रयांतर्गत आणले आहे आणि मासिक ३० टक्के प्रिमिअम वाढीची नोंद केली आहे.

इन्शुरन्सदेखोचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित अग्रवाल म्हणाले, ‘‘आम्हाला इन्शुरन्सदेखो कुटुंबामध्ये वेरक टीमचे स्वागत करताना आनंद होत आहे. एसएमई विम्यामधील त्यांचे कौशल्य भारत आणि इतर उद्योगातील सर्वोत्तम टेक साठ्यामधील आमच्या सखोल वितरण नेटवर्कशी पूरक असेल. हे धोरणात्मक पाऊल आम्हाला एसएमई विमा क्षेत्रातील आमची उपस्थिती अधिक दृढ करण्यास आणि आमच्या उत्पादन ऑफरिंग्जमध्ये वाढ करण्यास मदत करेल.’’

वेरकचे संस्थापक राहुल माथूर म्हणाले, ‘‘आम्हाला इन्शुरन्सदेखोसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. आमच्या टीमने एसएमई विमा क्षेत्रात प्रबळ ब्रॅण्ड निर्माण करण्यासाठी अथक मेहनत घेतली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की, आमचे एकत्रित प्रयत्न आमच्या ऑफरिंग्जना नव्या उंचीवर घेऊन जातील. इन्शुरन्सदेखोचे विमाकर्त्यांसोबतचे दृढ संबंध आणि प्रबळ पायाभूत सुविधा आम्हाला आमच्या सुरूवातीच्या काळात सामना करावी लागलेली आव्हाने जसे विमा कंपन्यांकडून योग्य कमिशन मिळवणे, योग्य टॅलेंटला नियुक्त करणे आणि एआय-आधारित विमा कंपनी एकत्रीकरण यांचे निराकरण करण्यामध्ये मदत करेल.’’


Back to top button
Don`t copy text!