स्थैर्य, मुंबई, दि.१६: भारतातील आघाडीची ऍग्रोकेमिकल कंपनी सेफेक्स केमिकल्स इंडिया लिमिटेडने मुंबईतील शोगुन ऑरगॅनिक्स लिमिटेडच्या अधिग्रहणाची घोषणा केली आहे. या अधिग्रहणानंतर सेफेक्सला ऍग्रोकेमिकल टेक्निकल सेगमेंटमध्ये विस्तारण्याचे एक व्यासपीठ तयार होईल आणि तसेच होम केअर अँड अग्रोकेमिकल टेक्निकल मॅन्युफॅक्चरिंग सेगमेंटमध्ये प्रवेश करता येईल. सेफेक्सचे प्रमोटर्स, श्री एसके चौधरी, श्री नीरज जिंदाल, श्री राजेश जिंदाल आणि श्री पियुश जिंदाल हे शोगुन ऑरगॅनिक्सच्या बोर्डावर नियुक्त होतील.
श्री एसके जिंदाल आणि श्री एसके चौधरी यांनी १९९१ मध्ये स्थापन केलेली सेफेक्स कंपनी भारतातील पिकांना अधिक संरक्षण देण्यास तसेच त्यांची उत्पादकता वाढवण्यास मदत करणारे ब्रँडेड ऍग्रोकेमिकल्स तयार करते व त्यांची विक्री करते. कंपनीने आपल्या युनिक मल्टी-ब्रँड मॉडेल आणि थेट वितरण धोरणाद्वारे भारतीय ऍग्रोकेमिकल मार्केटमध्ये ब्रँडेड फॉर्मुलेशन सेगमेंटची परिभाषाच बदलली आहे. भारतातील आघाडीच्या वृद्धीकेंद्रीत प्रायव्हेट इक्विटी फर्म क्रिसकॅपिटल कडून कंपनीने नुकतेच ५० दशलक्ष डॉलरचा निधी मिळवला. इंडियन होम केअर टेक्निकल सेगमेंटमध्ये शोगून ऑरगॅनिक्स ही बाजारात आघाडीवर आहे. ऍग्रोकेमिकल्ससाठी टेक्निकल निर्मितीची मंजूरी कंपनीला मिळालेली आहे.
सेफेक्सचे व्यवस्थापक नीरज जिंदाल म्हणाले, “सेफेक्स ग्रुपचा एक भाग म्हणून शोगुन ऑरगॅनिक्स आणि त्यांच्या टीमचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. भारतीय होम केअर टेक्निकल सेगमेंटमधील शोगुन ऑरगॅनिक्सचे प्रबळ नेतृत्व, मजबूत ग्राहक संबंध आणि निर्यात क्षमता यावर आमचा विश्वास आहे. सेफेक्सच्या पुढच्या टप्प्यातील वृद्धीकरिता हे एक योग्य पाऊल आहे. ऍग्रोकेमिकल टेक्निकल सेगमेंटमध्ये आणखी सुविधा देण्यासाठी आणि ऍग्रोकेमिकल निर्यात बाजारात विस्तार करण्यासाठी शोगुनच्या सध्याच्या पायाभूत सुविधांचा लाभ घेण्याचा आमचा मानस आहे.”