
दैनिक स्थैर्य । १० मार्च २०२३ । बारामती । ०८ मार्च जागतिक महीला दिनानिमित्त सहेली फाउंडेशन व प्रिटी ब्युटि फिटनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाणे ” स्त्रिया वरील अत्याचार ,लैंगिक शोषण याबाबत कायदे” चे प्रज्ञा काटे युवा चेतना संघटना च्या कायदेशीर तज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच शैक्षणिक, सामाजिक, राजकिय, वैद्यकीय ,व्यवसाईक,खेळ ,पोलीस आदी क्षेञातील १६ महीलांचा सन्मान व देशातील संस्कृती व पेहराव नुसार फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते.
धनश्री माजंरे, प्रा.अणा चौधरी यांनी प्रथम क्रमांक मिळवला .आयोजन सौ.नेहा पाध्ये सौ.रोहीणी खरसे आटोळे यांनी केले होते.
महिलांच्या कला, गुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे व जिद्द चिकाटी व आत्मविश्वास च्या जोरावर महिलांनी मिळवलेले यश कौतुकास्पद असल्याचे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्ष रोहिणी खरसे-आटोळे यांनी सांगितले. सुञसचालंन रुबिना निलौफर यानी केले.