दैनिक स्थैर्य । दि. ०५ जुलै २०२३ । बारामती । देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमधील एक असणाऱ्या इंडियन इस्टिट्यूट ऑफ सायंटिफिक एज्युकेशन अॅन्ड रिसर्चच्या प्रवेश परिक्षेत बारामतीच्या आचार्य अॅकॅडमीच्या ४ विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले आहे. पार्थ कुलकर्णी ( रॅंक १६५ ), सुयश पठाडे ( रॅंक १२९३ ) तर जान्हवी घोरपडे ( रॅंक १११२ ) आणि शिवतेज कदम ( रॅंक २४४१ ) ही या यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आहेत. या चौंघाचेही आचार्य अॅकॅडमीचे संचालक प्रा. ज्ञानेश्वर मुटकूळे, प्रा. सुमित सिनगारे, कमलाकर टेकवडे आणि प्रा. प्रवीण ढवळे यांनी अभिनंदन केले.
दरम्यान, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक एज्युकेशन अॅन्ड रिसर्च ( आयआयएसईआर ) या नामांकित संस्थेमध्ये प्रवेशासाठी घेतल्या गेलेल्या प्रवेशपरीक्षेचा निकाल जाहीर झाला. दि. १७ जून रोजी झालेल्या या परीक्षेसाठी ३४७५१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेत उर्तीर्ण विद्यार्थ्यांना या संस्थेच्या देशभरातील केंद्रांमध्ये बीएस – एम एस प्रोग्रॉम या ५ वर्षाच्या शिक्षणासाठी प्रवेश घेता येईल तसेच आयआयएसईआर – भोपाळ या संस्थेत ४ वर्षाच्या बीएस प्रोग्रामसाठीही प्रवेश घेता येईल.