आरोपी पंजाबी ऍक्टर दीप सिद्धूवर 1 लाखांचे बक्षीस घोषित, समाजकंटकांचे फोटोही जारी केले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नवी दिल्ली, दि.३: कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलनाचा आज 70 वा दिवस आहे. दरम्यान दिल्ली पोलिस सलग कारवाई करत आहेत. 26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसेप्रकरणी पोलिसांनी बुधवारी मोठी घोषणा केली. त्यांनी म्हटले की, दीप सिद्धू (पंजाबी अॅक्टर) आणि दुसरे आरोपी जुगराज सिंह, गुरजंट सिंह यांच्याविषयी माहिती देणाऱ्यांना 1-1 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

यासोबतच जजबीर सिंह, बूटा सिंह, सुखदेव सिंह आणि इकबाल सिंह यांच्यावर 50-50 हजार रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले आहेत. हे सर्व लाल किल्ल्यामध्ये झालेल्या हिंसेचे आरोपी आहेत आणि ते फरार आहेत. यापूर्वी पोलिसांनी मंगळवारी 12 फोटो जारी केले आहेत. यामध्ये लाल किल्ल्याची तोडफोड करणारे दिसत आहेत.

पोलिसांनी जारी केलेले फोटो
पोलिसांनी जारी केलेले फोटो

दीप सिद्धूने सिंघू बॉर्डरपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असल्याचा दावा केला एकिकडे पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. तर दुसरीकडे आरोपी दीप सिद्धू (पंजाबी अॅक्टर) सलग सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. त्याने बुधवारीही एक व्हिडिओ रिलीज केला. यामध्ये त्याने आपल्या विरोधात बोलणाऱ्यांना पाहून घेऊ अशी धमकी दिली आहे. यासोतबच स्वतः हरियाणामध्ये असल्याचा दावा करत म्हटले की, सिंघु बॉर्डरपासून केवळ अर्ध्या तासाच्या अंतरावर बसलो आहे.


Back to top button
Don`t copy text!