दैनिक स्थैर्य । दि. २८ सप्टेंबर २०२१ । महाबळेश्वर । चारित्र्याच्या संशयावरून घोडे व्यावसायिक राजेंद्र उर्फ राजू महादेव जाधव वय 55 रा. व्हॅलीव्हयुव रोड महाबळेश्वर याने काही दिवसांपूर्वी पत्नी बायना राजेंद्र जाधव रा. महाबळेश्वर हिला अंगावर पेट्रोल टाकुन जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला व घटनास्थळावरून पळ काढला होता. घटनेत गंभीर जखमी झालेल्या महीलेचा मुंबईतील कस्तुरबा गांधी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यु झाला होता.
फरार राजेंद्र जाधव याचा शोध महाबळेश्वर पोलीस घेत होते. दरम्यान, शनिवारी पुणेच्या आंबेगाव टेकडीवर एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेतएका माणसाचा कुजलेल्या व डोके नसलेला अवस्थेत मृतदेह एका व्यक्तीला दिसल्यानंतर त्याने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. तपासाअंती हा मृतदेह राजेंद्र महादेव जाधव याचा असल्याचे निष्पन्न झाले. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असून प्राण्यांनी मृतदेहाचे काही भाग फाडून टाकले असल्याने छिन्नविछिन्न मृतदेह झाला आहे. त्याने सात दिवसांपूर्वीच आत्महत्या केली असल्याची शक्यता भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन धामणे यांनी वर्तवली. रविवारी त्याचा मृतदेह मुलांच्या ताब्यात देण्यात आला.