स्थैर्य, फलटण दि.10: दि.16 जानेवारी 2015 रोजी सोनगाव बंगला, ता.फलटण येथे घडलेल्या खून व अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील आरोपीस सातारा जिल्हा न्यायालयाचे विशेष सत्र न्यायाधीश एस.जी.नंदीमठ यांनी जन्मठेप व 5 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याकडून देण्यात आलेली माहिती अशी की, दि .16 / 01 / 2015 रोजी 17.30 वा.चे.सुमारास सोनगाव बंगला ता.फलटण यादव व साबळे यांचे दुकानासमोर यातील आरोपी अंकुश दाजी चव्हाण वय 60 वर्षे रा.सोनगाव बंगला ता.फलटण जि.सातारा याने यातील मयत बाबासाो केशव भोसले हे सलूनचे दुकानासमोर बाकड्यावर बसलेले असताना त्यांचे पाठाणीवर मागून येवून त्यांचे अंगावर कॅनमधील रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले होते . त्यामध्ये ते गंभीर भाजून जखमी झाल्यामुळे त्यांना औषधोपचाराकरीता हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांनी मृत्यूपुर्व जबाब दिल्याने फलटण ग्रामिण पोलीस ठाणे गु.र.नं .202 / 2015 भादविक 302 , 435 सह अ.जा.ज.का.क .3 ( 2 ) ( 5 ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला होता.
फलटण विभागाचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे यांनी नमुद गुन्हयाचा उत्कृष्ठ तपास करुन आरोपीविरुध्द सबळ पुरावा प्राप्त करुन मुदतीत न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले होते . नमुद खटल्याची सुनावणी 4 थे , अति , विशेष सत्र न्यायाधीश, सातारा एस.जी.नंदीमठ यांचे न्यायालायामध्ये झाली असून दि .0 9 / 02 / 2021 रोजी न्यायालयाने आरोपी अंकुश दाजी चव्हाण यास जन्मठेप व 5000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे .
नमुद खटल्याच्या सुनावणीमध्ये सरकारी अभियोक्ता म्हणून अॅड.लक्ष्मणराव खाडे यांनी काम पाहिले असून त्यांना पैरवी अधिकारी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मुस्ताक शेख, प्रासिक्युशन स्कॉडचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, शिवाजी घोरपडे , म.स.फौ.सौ.घारगे, पो.हवा.शेख, शिंदे, म.पो.हवा.बेंद्रे, म.पो.ना.शिंदे पो.कॉ.कुंभार, भरते, म.पो.कॉ.घोरपडे यांनी मदत केली आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल व अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांनी तपासी अंमलदार रमेश चोपडे यांच्यासह तपास पथकातील सर्व पोलीस अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.