दैनिक स्थैर्य । दि.१३ एप्रिल २०२२ । सातारा । दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून फिर्यादीस धारदार चाकूने वार करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा शाबीत झाल्याने दोन वर्ष सक्त मजुरीची अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली आहे. दुसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी एस वावरे यांनी हे आदेश दिले.
या खटल्याची अधिक माहिती अशी दिनांक 9 मार्च 2020 रोजी हद्दपार आरोपी राघू चव्हाण याने फिर्यादी राजेंद्र जिजाबा जाधव यांच्या घरात अधिकाराने प्रवेश करून मला दारू पिण्यासाठी पैसे दे अशी मागणी केली. फिर्यादीने नकार देतात चव्हाण याने हातातील चाकूने तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणून फिर्यादीच्या छाती पोटावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. फिर्यादीची पत्नी शितल तिच्या गालावर चाकूने वार केले व तिला शिवीगाळ दमदाटी करून धक्काबुक्की करून तिथून पलायन केले.
याप्रकरणी वाठार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल घोंगडे यांनी आरोपीस अटक करून भक्कम पुरावे याद्वारे त्याच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश बीएस वावरे यांच्यासमोर झाली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गौरी लकडे यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिजे या खटल्यात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांनी दिलेली साक्ष सरकारी वकिलांचा प्रभावी युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपीला मंगळवार दि सुनावलेल्या शिक्षेमध्ये दोन वर्ष सक्तमजुरी चा समावेश आहे. या खटल्याच्या कामी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंग साहेब पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी योग्य ते मार्गदर्शन केले. पोलीस प्रोसेक्युशनस कॉलेजचे राजेंद्र यादव, पोलीस हवालदार शमशुद्दीन शेख, गजानन फरांदे, रेहाना शेख, अश्विनी घोरपडे यांनी योग्य ती मदत केली आहे.