दैनिक स्थैर्य । दि.२२ नोव्हेंबर २०२१ । पुसेगाव । पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अभय झाकीर काळे वय 19 रा मोळ ता खटाव हा बुध गावात येणार असलेबाबत गोपनीय माहिती मिळल्याने बुध येथे सापळा रचून आरोपी शेतातून पळून जात असताना पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यास ललगुण येथील घरफोडी च्या गुन्ह्यात अटक करण्यात आली.त्याचकडून घरफोडी गुन्ह्यातील 4000 रुपये किंमतीचे चांदीचे दागिने,मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर आरोपीवर पुसेगाव, वडूज,कोरेगाव,वडगाव निंबाळकर उरळी कांचन जिल्हा पुणे, या पोलीस ठाण्यात घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.अशा सराईत आरोपीस पकडण्यास पुसेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांना यश मिळाले.सदर गुन्हाचा अधिक तपास पोलीस हवालदार दिपक बर्गे हे करत आहेत.
सदर कारवाई मा.पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल ,अप्पर पोलीस अधीक्षक अजय बोराडे, मा उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली घरफोडी मधील सराईत आरोपीस स पो नि संदीप शितोळे यांचे मार्गदशनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे, पो हवालदार चंद्रकांत खाडे ,आनंदा गंबरे, सचिन जगताप, सुनील अब्दागिरी, पुस्कर जाधव ,अशोक सरक,साहिल झारी ,विपूल भोसले, पुसेगाव पोलीस ठाणे यांनी सहभाग घेवून आरोपीस अटक करण्यात आली.
त्यामुळे चोरी ,घरफोडी, चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना आळा बसणार आहे.या कामगिरीचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.