दैनिक स्थैर्य । दि. ०२ मार्च २०२२ । खंडाळा, बारामती । लोणंद, ता. खंडाळा व वडगाव निंबाळकर ता बारामती या पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिवसा घरफोडी करणाऱ्या टोळीतील एकाचा मुसक्या आवळण्यात लोणंद व वडगाव निंबाळकर पोलिसांना यश आले आहे.
लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील बीबी गावात दि. २२ रोजी दुपारी ३ सुमारास घरफोडी करून चोरीचा प्रयत्न झाल्याबाबत लोणंद पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने स.पो.नि. विशाल वायकर व लोणंद पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी पुढील तपास तसेच या चोरीतील सि.सि.टी. व्ही. फुटेज व तांत्रीक विप्लेशनाचे आधारे यात दोन आरोपी हे मोटार सायकलवरून येवून दिवसा बंद असणाऱ्या घरात घरफोडी करीत असल्याचे तसेच आरोपी हे बीड जिल्हयातील निष्पन्न करुन सदर आरोपी यांनी त्यावेळी वडगाव पोलीस ठाणे हददीत अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने वडगाव पोलीस ठाण्याचे सपोनि सोमनाथ लांडे व पोलीस स्टाफसह संयुक्त कारवाई करुन दि. २८ रोजी यातील मुख्य आरोपी देवीदास अभिमान काळे वय ३४ रा. आंधळेवाडी, ता. आष्टा, जि. बीड हा कर्जत पोलीस ठाण्यातील दरोडयासारख्या गुन्हयात फरारी असुन तो साखरवाडी परीसरात येणार असल्याची खात्रीलायक माहीती मिळाली असता स.पो.नि.विशाल वायकर व स.पो.नि सोमनाथ लांडे व पथकातील कर्मचारी यांनी संयुक्त सापळा लाथुन ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आरोपी हा कर्जत पोलीस ठाणे येथे दरोडयातील आरोपी असल्याचेही निष्पन्न झाले आहे. आरोपी याचेकडून गुन्हयात वापरण्यात आलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता आरोपीने खालील प्रमाणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
सातारा चे पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल व अति.पो. अधिक्षक अजित बोऱ्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल वायकर, सहा. पो. निरीक्षक सोमनाथ लांडे पोलीस उप-निरिक्षक गणेश माने, सहा फौजदार पाडवी, स.पो.फौ. मुल्ला स.पो.फौ. सपकाळ गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.हवा. आविनाश नलवडे, पो.ना. श्रीनाथ कदम, फैय्याज शेख, विठठल काळे, अभिजित घनवट, साहील पवार तसेच वडगाव पोलीस ठाण्याचे पथकातील पो.उप निरीक्षक शेलार, पो. हवा. वारुळे, नागटीळक, बो-हाडे, भोसले, पानसरे, भुजबळ, नाळेसांळुखे , जाधव, सिताप यांनी कारवाईत सहभाग घेतला.