अपघाती मृत्यूप्रकरणी चालकावर गुन्हा


 

स्थैर्य, सातारा, दि. 5 : कोडोली, ता. सातारा गावच्या हद्दीत झालेल्या कारच्या अपघातात एकजण ठार झाला होता. याप्रकरणी मद्य पिवून बेदरकार गाडी चालवणार्‍या चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत माहिती अशी, नितीन मोहनराव देशमुख वय 33 रा. तासगाव, ता. जि. सातारा हा दि. 1 सप्टेंबर रोजी सातारा – रहिमतपूर मार्गावर मद्य प्राशन करून कार चालवत होता. त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने गाडी चालवल्याने त्याचा कारवरील ताबा सुटून गाडी साईडपट्टीवरील मुरुमाच्या ढिगार्‍यावर जावून अपघातात झाला. या अपघातात सुमित सयाजी ताटे वय 35 जखमी झाले तर विक्रम सुगंध लोंढे यांचा मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी चालक नितीन देशमुख याच्यावर सातारा शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पो. ना. पी. डी. बधे करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!