
दैनिक स्थैर्य । दि. ०९ डिसेंबर २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातील दाखल गुन्हा शिक्षा झालेल्या विशेषतः महिलांसंदर्भात आरोपीच्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले होते . पाचगणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पोक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी भिकू मोहन राजपुरे राहणार राजपुरी तालुका महाबळेश्वर याला सातारा विशेष सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली होती हा आरोपी अपीलावर सुटून पुन्हा सातारा जिल्ह्यात वास्तव्य करत होता भविष्यात त्याच्याकडून महिलांसंदर्भात गैर कृत्य घडू नये याकरिता त्याला एक वर्षासाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
वाईचे प्रांत यांनी हे आदेश दिले आहेत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 57 प्रमाणे याचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी वाई यांच्याकडे सादर करण्यात आला होता उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर शितल दानवे खराडे यांनी याचा अहवाल सादर केला होता त्यामुळे राजपुरे याला एक वर्षासाठी साताऱ्यातून हद्दपार करण्यात आले आहे या हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी योग्य पाठपुरावा केला या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.