दैनिक स्थैर्य | दि. 14 डिसेंबर 2023 | सातारा | तालुक्यातील सुरवडी येथील रोहित उर्फ टक्या चिचळया पवार याने व त्याच्या साथिदारांनी चोरी केलेले सोन्याच्या दागिण्यापैकी (चालू बाजारभावा प्रमाणे) ३२,१०,०००/- रुपये किमतीचे ५३.२०० तोळे सोन्याचे दागिणे व ४६,०००/- रुपये किमतीचे चांदीचे दागिणे असा एकूण ३२,५६,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन १ दरोडा, ५ जबरी चोरी, १२ घरफोडी चोरी, ५ इतर चोरी असे एकूण २३ गुन्हे उघडकीस सातारा जिल्हा पोलीस विभागाच्या विशेष पथकाने आणले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी सातारा जिल्हयातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखा साताराचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिलेल्या आहेत. त्याअनुशंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पतंग पाटील यांचे अधिपत्याखाली एक तपास पथक तयार केले आहे.
लोणंद पोलीस ठाणे गु.र.नं.४७३/२०२३ भादविक ४५४, ३८० या गुन्हयामध्ये पोलीस अभिलेखावरील आरोपी रोहित उर्फ टक्या चिवळया पवार रा. सुरवडी ता. फलटण जि.सातारा याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास नमुद गुन्हयाचे तपासकामी पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पतंग पाटील यांनी त्याचेकडे मालमत्तेच्या गुन्हयाचे अनुशंगाने कौशल्यपुर्ण विचारपूस केली असता त्याने व त्याचे साथिदार यांनी खंडाळा, शिरवळ, लोणंद, फलटण, सासवड जि. पुणे येथे घरफोडी चांन्या केल्याचे सांगीतले असून आरोपी रोहित उर्फ टक्या चिचळया पवार याने व त्याच्या साथिदारांनी चोरी केलेले सोन्याच्या दागिण्यापैकी (चालू बाजारभावा प्रमाणे) ३२,१०,०००/- रुपये किमतीचे ५३.२०० तोळे सोन्याचे दागिणे व ४६,०००/- रुपये किमतीचे चांदीचे दागिणे असा एकूण ३२,५६,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन १ दरोडा, ५ जबरी चोरी, १२ घरफोडी चोरी, ५ इतर चोरी असे एकूण २३ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.
माहे नोव्हेंबर २०२२ पासून दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मोटार सायकलचोरी, इतर चोरी असे एकूण १३८ मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले असून नमुद गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यापैकी ३९१ तोळे सोने (३ किलो ९१० ग्रॅम) असा एकूण २,३८,७४,०००/-रुपये (दोन कोटी, अडतीस लाख, चीन्याहत्तर हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, पोलीस अंमलदार विश्वनाथ सपकाळ, अतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, सचिन साळुंखे, प्रविण फडतरे, सनी आवटे, मनोज जाधव, अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, राजू कांबळे, स्वप्नील कुंभार, अमित झेंडे, अजय जाधव, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, मोहन पवार, अरुण पाटील, विशाल पचार, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, मयुर देशमुख, संकेत निकम, प्रविण पवार, आधिका बीर, शिवाजी गुरव, पंकज बेसके, अमृत कर्पे, संभाजी साळुंखे, विजय निकम यांनी सदरची कारवाई केली आहे.