स्थैर्य, सातारा, दि.३: खंडणीच्या गुन्ह्यात सहा वर्षांपासून फरार असणारा व स्वतःचे नाव बदलून पोलिसांना गुंगारा देणार्या अट्टल गुन्हेगारास सातारा एलसीबीच्या पथथकाने क्षेत्र माहुली येथे सापळा रचून जेरबंद केले. मैशा उर्फ महेश उर्फ मीसू बाळू कांबळे असे त्याचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, खंडणीच्या गुन्ह्यातील सहा वर्षापासुन संशयीत फरा होता. त्यास अटक करण्याच्या सुचना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांनी पथक तयार करुन शोध सुरू होता.दि. 3 रोजी स.पो.नि.आनंदसिंग साबळे यांना आरोपी स्वतःचे नाव बदलून कारंडवाडी येथे राहण्यास असून तो क्षेत्र माहुली येथील बसस्टॉप जवळ येणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखे कडील अंमलदार यांनी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्यास पुढील तपासाच्या अनुषंगाने सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षकधीरज पाटील यांच्या सुचनेनुसार व पोनि सर्जेराव पाटील यांच्या मागदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, सहा.पोलीस उपनिरीक्षक जोतिराम बर्गे, पो.हवालदार विजय कांबळे, पो. ना. शरद बेबले, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, निलेश काटकर, गणेश कापरे, अमित सपकाळ, पो.कॉ. विशाल पवार, विक्रम पिसाळ, वैभव सावंत, रोहित निकम, सचिन ससाणे यांनी केली.