चार वर्षापासून फरार आरोपी पुसेगाव पोलिसांच्या ताब्यात


दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२१ | खटाव | जबरी चोरी गुन्ह्यांमधील चार वर्षापासून पोलिसांना चकवा देणारा सराईत चोरटा दत्तात्रय दादासाहेब मसुगडे वय 22 वर्ष राहणार रणसिंगवाडी ता. खटाव याला पुसेगाव पोलिसांनी काल मध्यरात्री शिताफीने पकडले.

सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे ,उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश केंद्रे यांच्या विशेष माहिती देऊन आरोपीला अटक करण्याच्या सूचना पुसेगाव पोलिसांना देण्यात आल्या होत्या. या कारवाईत पुसेगाव पोलीस स्टेशनचे सपोनि संदीप शितोळे, पोलीस हवालदार दत्तात्रय जाधव, पोलीस नाईक आनंदराव गंबरे ,पोलीस शिपाई विजय खाडे महिला पोलीस नाईक गीतांजली काटकर , पोलीस शिपाई कोमल काळेल व चालक पोलीस शिपाई मंगेश डोंबे यांना सहभाग घेऊन आरोपीला अटक करण्यात यश मिळाले

महिला पोलिसांचा सहभाग
महिलांनी प्रथमच रात्रीच्या वेळी आरोपीला पकडण्यात यश व प्रथमच सहभाग घेतल्याने खटाव तालुका व जिल्हास्तरामधून महिला पोलीस गीतांजली काटकर व कोमल काळेल या दोघींचं अभिनंदन व कौतुक केले जात आहे.


Back to top button
Don`t copy text!