
दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२३ । बारामती । विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती महाविद्यालयाने स्थापत्य अभियांत्रिकी शाखासाठी NBA मान्यता प्राप्त करण्यासाठी “National Board of Accreditation” या संस्थेकडे अर्ज केला होता. त्यामुळे NBA च्या तज्ञांनी १२, १३, १४ मे २०२३ या सलग तीन दिवस भेट दिली. या भेटीदरम्यान या तज्ज्ञांनी संस्थात्मक मिशन आणि उद्दिष्टे, संस्था आणि प्रशासन, पायाभूत सेवा सुविधा, अध्यापन आणि शिक्षणाची गुणवत्ता, अभ्यासक्रम, डिझाइन आणि पुनरावलोकन, ग्रंथालय, प्रयोगशाळा, उपकरणे, संगणक या सारख्या विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या सोयी सुविधा तसेच महाविद्यालयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग या सर्वाना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांचे NBA कार्यकारी समितीने ठरवल्याप्रमाणे अत्यंत काटेकोरपणे गुणात्मक क्षमतेने मूल्यांकन व मूल्यमापन केले. २१ जून २०२३ रोजी NBA (राष्ट्रीय मान्यता मंडळ) यांनी स्थापत्य अभियांत्रिकी शाखेला मान्यता दिल्याचे जाहीर केले. हि मान्यता मिळविण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचे विभाग प्रमुख डॉ. चित्तरंजन नायक, NBA स्थापत्य अभियांत्रिकी शाखा समन्वयक कु. पल्लवी बोके, NBA महाविद्यालयीन समन्वयक डॉ. रवी पाटील, सर्व criteria कोऑर्डिनेटर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग व विद्यार्थी या सर्वांनी अत्यंत मनापासून सहकार्य केले त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रा. स. बिचकर यांनी आभार मानले. यासाठी संस्थेच्या विश्वस्त मा. सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष अॅड. श्री. अशोक प्रभुणे, सचिव अॅड. निलीमा गुजर, खजिनदार श्री. युगेंद्र पवार, विश्वस्त डॉ. राजीव शहा, श्री, मंदार सिकची, श्री. किरण गुजर, रजिस्टार कर्नल श्री. श्रीश कंभोज यासर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.