शासनाने संविधाना नुसार देशातील दलित बंधू, भगिनी ,विद्यार्थी यांचे स्वसंरक्षण करून सर्वाना न्याय देण्यात यावा विलास खरात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १६ ऑगस्ट २०२२ । आटपाडी । आपण आपल्या भारत देशाचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना राजस्थान राज्यातील एका गांवात जातीच्या नावाने भेदभाव करुन पिण्याच्या पाण्यासाठी लहान मुलांस मारले जाते ही क्रुर घटना घडली आहे. संविधानाची मुल्ये आपण स्वीकारली असताना मानवतेला काळीमा फासणारी बाब वेदना दायिक ठरत आहे. ‌. राजस्थान राज्यातील सुराणा येथील सरस्वती विद्यालयात इ.३ री.त शिकणाऱ्या अनुसूचित जातीतील ( दलित) इंद्र कुमार मेघवाल या मुलांस शाळेतील मुख्याध्यापकाने बेदम व अमानुषपणे मारहाण केली त्यामुळे त्यांच्या कानांची नस फाटली डोळ्यास मार लागला यांचे कारण म्हणजे हेडमास्तर साठी ठेवलेल्या पिण्याच्या पाण्याच्या माठातील पाणी इंद्रकुमार या दलित मुलांने माठातील पाणी पिले मुळे त्यास अमानुषपणे मारहाण केली आहे.त्या मारहाणी मुळे २२ दिवसांनी कोवळ्या इंद्रकुमार चा दवाखान्यात मूत्यू झाला.हीबातमी ऐकून अनेक भारतीयांच्या मनास वेदना झाल्या असतील.रेकाँडची माहिती पाहीली असता असे दिसून येते की, हिंदी भाषिक पट्यातील राज्यात दोन, तीन वर्षांत अनुसूचित जाती ( दलित) वर अन्याय अत्याचार होत आहेत असे दिसून येते.त्याचीआकडे वारी खालील प्रमाणे १) राजस्थान राज्य १८,४१८ (२) मध्य प्रदेश १६,९५२ (३) उत्तर प्रदेश ३६,४६७ (४) बिहार २०,९७३ अनुसूचित जाती जमाती वर अन्याय अत्याचार झालेल्या केशीस नोंद आहेत. याबाबत कृपया अनुसूचित जाती आयोगाने कृतीशील निर्णय घेण्यात यावा ही विनंती . देशातील अनेक राज्यांत अनुसूचित जाती जमाती वर अन्याय अत्याचार होत आहेत. याबाबत कृपया लोकप्रतिनिधींनी जनतेचे प्रबोधन करणे आवश्यक आहे.जातीय भूमिकेतून एका चिमुकल्यांचा जीव गेला आहे हे वास्तव नाकारता येणार नाही.शासनाने संविधाना नुसार या देशातील दलितांचे स्वसंरक्षण करून त्यांना सामाजिक न्याय देण्यात यावा. ही विनंती आहे. कळावे, आयु विलास खरात आटपाडी जि सांगली


Back to top button
Don`t copy text!