खासदार रणजितसिंह यांच्या कामकाजानुसार पुन्हा संधी मिळेल : प्रदेशाध्यक्ष बावनकुळे

जर आमदार गोरेंच्या नशिबात असेल तर नक्कीच नामदार होणार


दैनिक स्थैर्य | दि. 26 डिसेंबर 2023 | फलटण | आता खासदार रणजितसिंह यांना पुन्हा खासदार करण्यामध्ये अडचण नाही. खासदार रणजितसिंह यांनी देशामध्ये सर्व खासदारांच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट कामकाज केले आहे. देशातील टॉप 10 खासदारांच्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव आहे. यासोबतच आमदार जयकुमार गोरे यांनी मंत्रालयाच्या 7 मजली इमारतीमध्ये असणाऱ्या प्रत्येक खात्यातून निधीवर दरोडा टाकला आहे. जर जयकुमार गोरे यांच्या नशिबात लाल दिवा असेल तर लांब होवू शकेल पण थांबवू शकणार नाही.


Back to top button
Don`t copy text!