दैनिक स्थैर्य । दि.१९ जानेवारी २०२२ । मुंबई । देशातील ७६ टक्के लोकांसाठी मालमत्ता हा अत्यंत लोकप्रिय गुंतवणुकीचा पर्याय ठरला असून घर खरेदीतून सुरक्षिततेची भावना वाढीस लागल्याचे नोब्रोकर.कॉम (NoBroker.com) या भारतातील पहिल्या प्रॉपटेक युनिकॉर्न द्वारे जाहीर करण्यात आलेल्या पाचव्या वर्षी इंडिया रिअल इस्टेट रिपोर्ट २०२१ मधून निदर्शनास आले आहे. एसआयपी/शेअर्स आणि सोने हे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असून अत्यंत कमी टक्केवारीने बिटकॉइनची निवड केली आहे. यातील माहिती दिल्ली-एनसीआर, बंगळुरू, मुंबई, पुणे, चेन्नई आणि हैदराबाद येथील २१००० पेक्षा अधिक ग्राहकांसोबत संवाद साधून तसेच त्यांच्या व्यासपीठावरील १६ दशलक्षपेक्षा अधिक वापरकर्त्यांकडून गोळा केलेल्या माहितीवर आधारित राहून मिळवण्यात आली आहे.
सर्वेक्षणात सामील ४३ टक्के ग्राहकांनी २०२२ या वर्षात ते गुंतवणुकीसाठी आणखी एक मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले. तसेच ८४ टक्के लोक या गोष्टीचा विचार करतात की सध्याची वेळ अंतिम वापरासाठी मालमत्ता खरेदी करण्यासाठीची योग्य आहे. त्यातून हे दिसते की, बाजारपेठेत सध्या खूप रेलचेल आहे. हे निष्कर्ष सध्या सुरू असलेल्या वर्क फ्रॉम होम संस्कृतीशी आणि हायब्रिड संस्कृतीशी, बिल्डर्सनी दिलेल्या सवलती आणि ऐतिहासिक गृह कर्ज दरांशी जुळणारे आहेत.
अंशतः लॉकडाऊन आणि प्रतिबंधित हालचालींमुळे ग्राहकांना पैशाची बचत करण्याची संधी होती, कारण हे पैसे अन्यथा सुट्ट्या आणि इतर जीवनशैलीच्या संबंधित पर्यायांवर खर्च झाले असते. यासोबत घर घेण्याची गरजही निर्माण झाली होती आणि त्यामुळे खरेदीचे बजेट आणखी वाढले. त्यामुळे १५ टक्के लोक रु. १ कोटींपेक्षा अधिक रकमेचे (२०२० पेक्षा ४ टक्के जास्त आणि २०१९ पेक्षा ८ टक्के जास्त) घर खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील होते.
या काळात ३ बीएचकेची मागणीही मागील वर्षाच्या २९ टक्क्यांच्या तुलनेत ३३ टक्क्यांनी वाढली. २ बीएचकेला सर्वाधिक मागणी होती आणि यातील घरे ३७ टक्के लोकांनी घेतली. तथापि, त्यांच्या लोकप्रियतेची काही टक्केवारी ३ आणि ४ बीएचके घरांमध्ये विभाजित झाली आहे.
ही कंपनी भारतातील सर्वांत मोठी ब्रोकरेजमुक्त मालमत्ता पोर्टल असून तिने सध्या तिचे अस्तित्त्व असलेल्या सर्व शहारंमध्ये २०२१ मध्ये २८७४ कोटी रूपयांचे ब्रोकरेज वाचवले आहे. बंगळुरूने सलग तिसऱ्या वर्षी कमाल (७८७ कोटी रूपये) वाचवले, त्यानंतर मुंबई (६५३ कोटी रूपये), चेन्नई (४९७ कोटी रूपये), पुणे (४२४ कोटी रूपये), हैदराबाद (२६४ कोटी रूपये) आणि दिल्ली एनसीआर (२५० कोटी रूपये.)
२०२१ च्या शेवटच्या तिमाहीत कार्यालये उघडण्यास सुरूवात झाल्यानंतर कामाच्या ठिकाणाजवळ राहण्यासाठी लोकांनी जास्तीत-जास्त प्रयत्न सुरू केले. यावर्षी ८० टक्के रहिवाशांनी आपल्या कामाच्या ठिकाणापासून जवळ राहण्याचा पर्याय निवडला तर ७८ टक्के ग्राहक शहरांतर्गत घर खरेदी करण्याचा पर्याय शोधत आहेत. २०२०च्या अहवालात कामाच्या ठिकाणापासूनचे अंतर घरांसाठी प्राधान्याच्या यादीत खूप खाली आले आहे.
७८ टक्के ग्राहकांनी राहण्यास तयार मालमत्तांमध्ये जाण्याचा पर्यय निवडला. विलंबित बांधकाम आणि ताबा हे या प्रवाहातील सर्वांत मोठे चालक आहेत. या निष्कर्षांतून असेही दिसले की, ७३ टक्के लोक घर खरेदी करण्यातील एक सुसंगत घटक म्हणून वास्तू मानतात. ५५ टक्के रहिवासी वास्तू तपासतात.
नोब्रोकर.कॉमचे सह-संस्थापक आणि सीबीओ सौरभ गर्ग म्हणाले की, “मोठ्या घरांची मागणी आणि खरेदीचे मोठे बजेट त्याचबरोबर शहराच्या मर्यादेत खरेदी करण्यास प्राधान्य यातून २०२२ मध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात सकारात्मक वातावरण दिसून येते. २०२१ हे एक महत्त्वाचे वर्ष असून रिअल इस्टेट बाजारपेठेत अनेक सकारात्मक बदल आणि नवसंशोधने झाली आहेत. रेडी टू मूव्ह इन मालमत्तांची मागणी अद्यापही मोठी आहे, त्याचबरोबर व्हिडिओ टूर्सना मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्याचप्रमाणे अंतिम वापरासाठी घराची मालकी गृहकर्जांच्या ऐतिहासिक स्तरावरील कमी व्याजदरामुळे आणि निवासी मालमत्ता देत असलेल्या सुरक्षेमुळे मौल्यवान मालमत्ता ठरेल. अनिश्चित भविष्यामुळे रिअल इस्टेट हे अंतिम वापरकर्त्याची बाजारपेठ असेल. तसेच गुंतवणूकदारांचा विश्वासही परत येत असताना पाहून दिलासा मिळाला आहे. जागतिक साथीने तंत्रज्ञानात्मक हस्तक्षेपासाठी मार्ग आखून दिला आहे.”
जग आणखी डिजिटल होत असताना व्हिडिओ वॉकथ्रूजची संकल्पना जिला २०२० मध्ये प्रचंड महत्त्व प्राप्त झाले- ती आगामी वर्षांतही कायम राहणार आहे. ही उपाययोजना मालमत्ता निवडण्यासाठी तसेच भाड्याने देण्यासाठीही उपयुक्त आहे, कारण त्यामुळे घराचे आकारमान, रचना, दिशा आणि लेआऊट या गोष्टी सहजपणे दिसून येतात. २०२१ मधील ७७ टक्के रहिवाशी या गोष्टीवर विश्वास ठेवतात की, व्हिडिओ टूर्स लोकांना मालमत्ता पाहण्यासाठी मोठी मदत करतात.