अपघाती मृत्यूप्रकरणी गुन्हा


स्थैर्य, सातारा, दि. 30 : पुणे-बेंगलोर महामार्गावर शेंद्रे, ता. सातारा येथे दुचाकी घसरून एकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला होता. याबाबत माहिती अशी, रणजित पंढरीनाथ खारगे वय 40, रा. कुंडल, ता. पलूस हे जुपीटर मोटारसायकलवरून पुणे-बेंगलोर महामार्गावरून निघाले होते. यावेळी त्यांच्याकडे वाहन परवाना नव्हता. शिवाय निष्काळीपणे भरधाव वेगाने ते वाहन चालवत असताना शेंद्रे गावच्या हद्दीत त्यांची दुचाकी घसरून अपघात झाला. यामध्ये ते गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!