पिंपरदमध्ये पालखी महामार्गावर अपघात; एक महिला जागीच ठार


फलटण -पंढरपूर पालखी मार्गावर आज सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास एसटीची व वेरना गाडीची समोरासमोर धडक होऊन एक महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली.

याबाबत घटनास्थळावरून माहिती अशी कि,फलटण – पंढरपूर मार्गावर आज सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास मुंजवडी येथून फलटणच्या दिशेने निघालेली एस टी (क्रं. MH-14 BT1267) असताना समोरून फलटणहून सांगोल्याकडे निघालेली वेरना गाडी ( क्रं. MH-12 DY1502 ) यांची पिंप्रदजवळ समोरासमोर धडक होऊन यामध्ये वेरना गाडीतील एक वृद्ध महिला जागीच ठार झाली तर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर फलटण येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू असून पोलीस प्रशासन अधिक तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!