दैनिक स्थैर्य । दि.१८ फेब्रुवारी २०२१ । सातारा । विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील पोलीस वाहनाला खंडाळा येथे अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, हा अपघात फार गंभीर नव्हता त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण प्रवीण दरेकर यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर काही कामानिमित्त पुण्यावरून महाबळेश्वरला निघाले होते. त्यांच्या मुख्य वाहना बरोबर पोलिसांच्या वाहनांचा ताफा होता. शिरवळच्या पुढे हा ताफा आल्यानंतर पारगाव खंडाळा गावच्या हद्दीत महामार्गावर अचानक वाहतुकीला अडथळा आल्याने एका वाहनाने ब्रेक मारला. त्यामुळे दरेकर यांच्यापुढील दुसऱ्या पोलीस वाहनाला वेग नियंत्रित न झाल्याने दोन वाहनांची किरकोळ धडक झाली.
एका वाहनाच्या बंपर चे थोडे नुकसान झाले प्रवीण दरेकर यांनी ताबडतोब रस्त्याच्या कडेला वाहने थांबून पोलीस कर्मचाऱ्यांची तात्काळ चौकशी केली नुकसानग्रस्त वाहन दुरुस्ती ला पाठवून देण्यात आले या अपघाताची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांची चलबिचल झाली मात्र स्वतः प्रवीण दरेकर यांनी आपण सुरक्षित असून आपल्याला कोणताही अपघात झाला नाही असे स्पष्ट केले दरेकर यांच्या वाहनांचा ताफा त्यानंतर तात्काळ महाबळेश्वरला रवाना झाला.