पिसाळवाडी येथे अपघात..दुचाकीचालक ठार तर एक जण जखमी..!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.०४ एप्रिल २०२२ । खंडाळा । पिसाळवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये एका हॉटेललगत असणाऱ्या वखारीसमोर अज्ञात वाहनाने पाठीमागून दिलेल्या धडकेमध्ये हितेश गंभीर परिहार (वय ३२ सध्या रा.शिरवळ ता.खंडाळा) हा दुचाकीचालक ठार तर पाठीमागे बसलेला गणेश चंद्रकांत चव्हाण (वय २७,मूळ रा.जाखणगाव ता.खटाव सध्या रा.शिरवळ ता.खंडाळा) हा युवक जखमी झाला आहे.

याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, शिरवळ ता.खंडाळा याठिकाणी एका ऍग्री मॉलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून हितेश परिहार हा व गणेश चव्हाण हा वाशिंग सेंटरवर कामाकरीता आहे.दरम्यान,गणेश चव्हाण हा पूर्वी शिवाजीनगर ता.खंडाळा याठिकाणी कामाकरिता असल्याने त्याठिकाणी साडी आणण्याकरिता नवीन घेतलेल्या दुचाकीवरून शिवाजीनगर याठिकाणी हितेश परिहार याच्याबरोबर गेला होता. यावेळी साडी घेतल्यानंतर शिरवळ याठिकाणी परतत असताना पिसाळवाडी गावच्या हद्दीमध्ये एका हॉटेललगत असणाऱ्या वखारीजवळ पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात मालट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीवरील दुचाकीचालक हितेश परिहार व गणेश चव्हाण हे दोघे गंभीर जखमी झाले. यावेळी संबंधितांना शिरवळ येथील खाजगी रुगालयामध्ये दाखल केले असता हितेश परिहार याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी हितेश परिहार याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करण्यात येऊन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची फिर्याद गणेश चव्हाण यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई,पोलीस अंमलदार संजय संकपाळ हे करीत आहे.


Back to top button
Don`t copy text!