अपघात : एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात, सुदैवाने खडसेंसह गाडीतील सर्वजण सुखरुप


 

स्थैर्य, जळगाव, दि.११: माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना धरणगाव-जळगाव मार्गावर घडली आहे. वेगात असलेल्या खडसेंच्या कारचे टायर फुटल्याने हा अपघात झाला. सुदैवाने अपघातात खडसे सुखरुप असून गाडीतील कोणालाही दुखापत झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत खडसेंनी अमळनेर येथील कार्यक्रम पार पाडले. यानंतर खडसे जळगावकडे येत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. धावत्या गाडीचे टायर फुटले, मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवत गाडीवर नियंत्रण मिळवले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!