‘अजिंक्यतारा’च्या गळीत हंगामाची तयारी करण्यास वेग ऊस तोडणी-वाहतूक यंत्रणा करारबध्द करण्यास प्रारंभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ९ जुलै २०२१ । सातारा । अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने येत्या 2021-2022चे गळीत हंगामाची पूर्व तयारी जोमाने सुरू केलेली असून गळीत हंगामाची सुरूवात निर्धारीत वेळेत होण्याच्या दृष्टीने मशिनरी विभागाकडील मशिनरी देखभाल-दुरूस्तीची कामे युध्दपातळीवर सुरू आहेत. या हंगामाकरीता कारखान्याने आतापासूनच ऊस तोडणी-वाहतूक यंत्रणा करारबध्द करण्याचे काम सुरू केलेले आहे. त्याचा शुभारंभ म्हणून काल मंगळवार दि 6 रोजीचे शुभमुहूर्तावर कारखाना स्थळावर कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा सौ.वेदांतिकाराजे भोसले यांच्या शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सांवत, व्हा. चेअरमन विश्‍वास शेडगे, संचालक व कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांच्या उपस्थितीमध्ये ऊस तोडणी-वाहतुकीचे करार करून घेण्याचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी श्रीमंत सौ. वेदांतिकाराजे भोसले (वहिनीसाहेब) म्हणाल्या, साखर कारखानदारीत ऊस वाहतूकदार व ऊस तोडणी यंत्रणा हे दोन घटक महत्वाचे असून हे दोन घटक असल्याशिवाय कारखान्याचा गळीत हंगाम पूर्ण होऊ शकत नाही, हे सर्वश्रृत असल्याचे त्यांनी सांगून कोरोना स्थितीमध्येसुध्दा ऊस वाहतूकदार, तोडणी यंत्रणा यांनी न डगमगता कारखान्याचे हित लक्षात घेऊन सन 2020-21 चा गळीत हंगामअखेर पर्यंत कामावर कार्यरत राहून गळीत हंगाम यशस्वीपणे संपन्न करण्यास मोलाचा हातभार लावला, असे सांगून त्यापुढे म्हणाल्या की, कारखान्याचे सन 2021-22चे गळीत हंगामाकरीता कारखान्याकडे 9700 हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झालेली असून याही हंगामात विक्रमी गाळप व अत्युत्तम साखर उतारा काढण्याचा संचालक मंडळाचा मनोदय असून, कारखान्याकडे नोंद केलेला सर्वचा सर्व ऊस सभासद, बिगर सभासदांनी गाळपास पुरवून गळीत हंगाम यशस्वीपणे संपन्न करण्यास आवाहन केले.

त्यापुढे अशाही म्हणाल्या की, सभासद व बिगर सभासद ऊस उत्पादक शेतकरी यांना कारखान्याचा केंद्रबिंदू मानून सभासदांची कारखान्याप्रती विश्‍वासार्हता टिकून रहावी, याची काळजी घेत सभासदांना जास्तीत जास्त आर्थिक लाभ देण्याचा संचालक मंडळाचा सदैव प्रयत्न राहीला असून संस्थेचा पारदर्शक व लोकाभिमुख कामकाज संचालक मंडळ करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

संचालक राजाराम जाधव (तात्या), संचालक नितीन पाटील, संचालक इंद्रजीत नलवडे, माजी संचालक चंद्रकांत घोरपडे, वाहतूक संस्थेचे चेअरमन बाळकृष्ण फडतरे, वाहतूक संस्था संचालक दिलीप निंबाळकर (आबा), शेती अधिकारी विलास पाटील तसेच वाहतूक संस्था मॅनेजर पैंगबर शेख इत्यादी व बहूसंख्येने तोडणी वाहतूक मुकादम हजर होते.


Back to top button
Don`t copy text!