
स्थैर्य, सातारा, दि. 15 : शहरात गल्लोगल्ली चौकाचौकात स्ट्रीट लाईट आहेत. अलिकडच्या तीन वर्षात या सोडीएम व्हेपरचे दिवे बसवण्यात आले आहेत. यामध्ये उन्हाळय़ात ज्या ज्या ठिकाणी बिघाड झाला होता.तो दुरुस्ती करण्याची मागणी पालिकेच्या विद्युत विभागाकडे त्या त्या प्रभागातील नगरसेवकांकडून होताच लगेच कार्यतत्परता दाखवून कामाला प्रारंभ केला जातो. गेल्या पंधरा दिवसामध्ये तर विद्युत विभागाचे अभियंता महेश सावळकर यांनी प्रत्येक प्रभागातील अडचणी प्राधान्याने सोडवण्याकडे कल दिला आहे. पावसाळय़ात कामे बहुतांशी पूर्णत्वाच्या दिशेने आहेत.
शहरात सुमारे 6 हजार स्ट्रीट लाईट आहेत. संपूर्ण शहर उजळून टाकले आहे. त्यातील काही दिवे उन्हाळयात नादुरुस्त झाले आहेत. ज्या ज्या ठिकाणी नादुरुस्त झाले आहेत. त्या ठिकाणीचे दुरुस्तीचे काम लगेच हाती घेण्यात विद्युत विभाग कुठेही कमी पडत नाही. विद्युत विभागाचे अभियंता महेश सावळकर यांच्याकडे तक्रार जातात ते लगेच सुचना देवून काम करवून घेतात. पावसाळयात शहरात कुठेही कुठल्या चौकात अंधार नको म्हणून ते कार्यतत्पर राहत आहेत. नगरसेवकांनी मागणी करताच तेथे लगेच दुरुस्ती करुन घेतली जात आहे. प्रभाग 15मध्ये नगरसेवक धनंजय जांभळे यांनी 15 स्ट्रीट लाईटची दुरुस्ती करुन घेतली.त्याबद्दल अभियंता सावळकर यांचे कौतुक होत आहे.