स्थैर्य, सातारा, दि. १९: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून ती गर्भवती राहिल्यानंतर तिचा जीवे मारण्याची धमकी देवून गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणाती संशयित विधीसंघर्ष बालक असल्याने त्याच्यावर सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत महिती अशी, एका सोळा वर्षाच्या मुलीचा अज्ञानाचा गैरफायदा घेवून वनवासवाडी पसिरातील संबंधित विधी संघर्ष बालकाने तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यातून मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास भाग पाडून गर्भपात करवला. तसेच याबाबत कोणास काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पो. उ. नि. भगत तपास करत आहेत.