स्थैर्य, फलटण, दि. २२ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुऴे सातारा जिल्ह्यासह फलटण तालुक्यात दुसऱ्यांदा लॉकडाऊन लावण्याची परिस्थिती उद्भवली होती. त्यानंतर 15 दिवस, ७ दिवस करत लॉकडाऊन वाढतच गेला. परंतु मे महिन्याच्या शेवटी कोरोनाचे केसेस कमी झाल्यामुळे लोकांना आशा होती की, जूननंतर तरी, हा लॉकडाऊन संपेल. परंतु त्यानंतर आता हा लॉकडाऊन आणखी 15 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. परंतु यामध्ये चांगली गोष्ट अशी की, राज्यातील ज्या भागात कोरोना रुग्ण कमी आहेत, त्या भागात सरकारने काही सवलती दिल्या गेलेल्या आहेत. त्याताच एक भाग म्हणून सोमवार दि. २१ जुन २०२१ पासून फलटण तालुक्यातील लॉकडाऊन शिथिलता देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता हळूहळू फलटणची बाजारपेठ उघडली आहे.
फलटणमध्ये देखील रुग्ण संख्या कमी असल्याने फलटणमध्ये काही सवलती दिल्या गेलेल्या आहेत. कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवतांना सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सोमवार ते शुक्रवार सर्व प्रकारच्या दुकानांना उघडण्यास परवानगी दिली आहे. तर अत्यावश्यक सेवांची दुकाने ही संपूर्ण आठवडाभर सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे पुन्हा आता फलटण तालुक्यातील दुकाने व अस्थापना ह्या सुरू झालेले आहे.
नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक सेवांची दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेत खुली राहतील तर मेडीकल व वैद्यकीय सेवांची दुकाने ही सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहतील. त्याशिवाय ज्या वस्तू अत्यावश्यक वस्तूंशी संबंधित नाहीत, अशा दुकाने शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक दुकाने वगळून इतर सर्व दुकाने व अस्थापने पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.