फलटणमध्ये घरफोडी करणाऱ्या चोरांकडून सुमारे चार लाखाचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : शहरात सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत घरफोडीच्या गुन्हा उघडकीस आणून संशयित आरोपींकडून चार लाख ११ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून यामध्ये चार चाकी सह सोन्या चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. 

या बाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, बारामती कडून फलटणकडे एक इसम हा आपल्या कडील चोरीचे दागिने विक्रीकरिता घेऊन येणार आहे. व तो MH १० AQ ०६८० या क्रमांकाच्या छोटा हत्ती या वाहनातून प्रवास करीत आहे, अशी माहिती सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांच्या पथकाने फलटण शहरातील सोमवार पेठे येथे बारामती रस्त्याच्या बाजूला सापळा रचला. त्याच वेळी छोटा हत्ती क्रमांक MH १० AQ ०६८० ला बारामती कडून येत असताना थांबवले. या वेळी त्या मध्ये बसलेल्या दोन इसमाची झडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्या चांदीचे दागिने मिळून आले. या बाबत त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. 

अधिक चौकशी केली असता त्यांनी फलटण शहरामध्ये मार्च महिन्यात चोरी केली असल्याची सांगितले. या वेळी समंधीतांकडून ३७ ग्रॅम ९६० मिली सोन्याचे गंठण, १० ग्रॅम ४४० मिलीचा सोन्याचा नेकलेस, २२ ग्रॅम ९४० मिलीच्या दोन सोन्याच्या बांगड्या, १ ग्रॅम ६९० मिलीचे सोन्याचे दोन कानातील टॉप्स, ४ ग्रॅम ९९० मिलीचे एक सोन्याचे बिस्कीट, ७ ग्रॅम ९०० मिलीची चांदीची अंगठी, ४ ग्रॅम ३४० मिलीचे चांदीचे दोन बिछवे असा ७७ ग्रॅम ७५ मिली सोन्याचा दागिन्यांचा २ लाख ३३ हजार व चांदीचा १२ ग्रॅम २४ मिली दागिन्यांचा १३ हजार रुपयांचा असा एकूण २ लाख ४६ हजार रुपयांचा सोने व चांदीच्या दागिन्यांचा व छोटा हत्ती सह एकंदरीत चार लाख ११ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलेला आहे. समंधित मुद्देमालाचें मालक पोलिसांना मिळून आले नसल्याने फलटण शहर व परिसरातील ज्यांच्या घरी चोरी झालेली आहे. त्यांनी सदर मुद्देमालाबाबत खात्री करावी, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आलेले आहे. 

  

सदर कारवाई मध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील यांनी दिलेल्या सूचना नुसार व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक आनंदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, सहाय्यक पोलीस फौजदार ज्योतीराम बर्गे, उत्तम दबडे, पोलीस हवालदार सुधीर बनकर, मुबीन मुलाणी, विनोद गायकवाड, पोलीस नाईक शरद बेबले, मोहन नाचन, संतोष जाधव, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, पोलीस कॉन्स्टेबल विद्या पवार, तनुजा शेख, विक्रम पिसाळ, वैभव सावंत, केतन शिंदे, अनिल खटावकर, चालक संजय जाधव, विजय सावंत तसेच फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विशाल भंडारी, पोलीस नाईक नितीन भोसले यांनी सहभाग घेतला होता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!