फलटण येथे प्रतिबंधित गुटखा, पानमसाल्याचा सुमारे ४ हजारांचा साठा जप्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २१ जून २०२४ | फलटण |
अन्न व औषध प्रशासनाने फलटण येथील महात्मा फुले चौकात असलेल्या साईनाथ पान शॉपवर दि. १९ जून २०२४ रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास छापा टाकून येथे अवैधरित्या विक्री होणारा प्रतिबंधित असलेला पानमसाला, गुटखा, सुगंधी सुपारी, तंबाखूचा एकूण १.२ किलो साठा (किंमत ३९६९/- रुपये) जप्त केला. या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात साईनाथ पान शॉपचा विक्रेता व मालक अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल रामभाऊ जगताप (वय २५ वर्षे, विक्रेता, रा. कसबा पेठ, पवार गल्ली, जबरेश्वर मंदिराजवळ, फलटण) व रामभाऊ जगताप (टपरी मालक, रा. कसबा पेठ, पवार गल्ली, जबरेश्वर मंदिराजवळ, फलटण) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

हा छापा अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकारी प्रियांका वाईकर यांच्या पथकाने टाकला. यावेळी पथकाने साईनाथ टपरीतून विमल पानमसाल्याच्या २.५ ग्रँमच्या ८७ पुड्या (एकूण किंमत ३४८/- रु.), वि १ टोबॅकोच्या ०.४ ग्रँमच्या ८५ पुड्या (एकूण किंमत ८५/- रु.), विमल पानमसाला किंग पॅकच्या प्रत्येकी ११.५ ग्रँमच्या २० पुड्या (किंमत ३६०/- रु.), वि १ टोबॅको किंग पॅकच्या प्रत्येकी १.८ ग्रँमच्या २३ पुडया (किंमत ४६/- रु.), आरएमडी पानमसाला ३.५ ग्रँमच्या १०० पुड्या (किंमत १५००/- रु.), एम सेंटेड टोबॅको ०.२५ ग्रँमच्या १४५ पुड्या एकूण किंमत १४५०/- रु., राजू इलायची सुपारी ११० ग्रँमचे ३ पुडे (किंमत १८०/- रु.) असा मुद्देमाल हस्तगत केला.

या प्रकरणी अधिक तपास पो. उपनिरीक्षक दातीर करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!