फलटणसह माढा मतदारसंघामधील तालुक्यांतील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांच्या विकासकामांसाठी सुमारे ४ कोटींचा निधी उपलब्ध

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २३ मार्च २०२३ | फलटण |
राज्य शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत सन २०२२-२३ या वर्षासाठी सातारा जिल्ह्यातील फलटण व सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदार संघातील करमाळा, सांगोला, माळशिरस, माढा या तालुक्यांनाही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सूचविलेल्या ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांच्या गावाचा विकास करण्यासाठी, या घटकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी वाचनालय, अभ्यासिका, धम्म केंद्र, विपश्यना केंद्र, बौद्ध विहार बांधणे, रस्ता काँक्रिटीकरण करणे, दलित वस्तीमध्ये सभामंडप बांधणे, दलित वस्तीकडे जाणारे रस्ते घेणे या शीर्षकाखाली निधी उपलब्ध झाला आहे.

यामध्ये फलटण तालुक्यातील साखरवाडी, गोखळी, गुणवरे, कोळकी, सासवड, हिंगणगाव, बरड, जावली, निंबळक, पाडेगाव, सोमंथळी, उपळवे, गिरवी, ढवळ, ताथवडा, गराडेवाडी तालुका माण, दहिवडी शहर तालुका माण असे एकूण १ कोटी ५९ लाख रुपये व माढा लोकसभा मतदारसंघातील अजनाळे, कडलास, कोळा, जुनोनी, सोनंद, नाझरे, भाळवणी, कुर्डवाडी, तांबवे तालुका माढा, अकोले खुर्द माढा, अकोले बुद्रुक वडोली ता.माढा, अकलूज चौक, ता.माळशिरस, महाळुंग ता. माळशिरस, नातेपुते, पानीव, माळीनगर, बिजवडी, वीट तालुका करमाळा, जिंती तालुका करमाळा, कोळगाव तालुका करमाळा, पांगरे तालुका करमाळा, जेऊर तालुका करमाळा, दहिगाव तालुका करमाळा, हिंगणी तालुका करमाळा, एकतपूर तालुका सांगोला, असे २ कोटी ४१ लाख रुपये अशा दोन्ही जिल्ह्यांकरीता एकत्रित ४ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.

सुमारे ४ कोटींचा निधी उपलब्ध झाल्यामुळे या भागातील छोटी-मोठी विकासकामे होण्यास नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहेत.


Back to top button
Don`t copy text!