दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२१ । सातारा । शेंद्रे ता. सातारा येथील अभयसिंहराजे भोसले इन्स्टिट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्नि येथे बुधवार दि. ६ सकाळी १०.३० वाजत ऑटोमोबाईल इंजि., मेकॅनिकल इंजि., इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि, इलेक्ट्रीकल इंजि. प्रॉडक्शन इनि. या विभागातील सन २०१९, २०२०, २०२१ वर्षात पास झालेल्या विध्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले आहे.
संस्थेच्या अध्यक्षा सौ. वेदांतिकाराज भासले यांनी सातारा तालुक्याचे भाग्यविधाते स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराज भासले यांच्या नावाने सन २००८ मध्ये पदविका तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाचे दालन सुरु करून ग्रामिण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली आहे. विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट, सातारा संचलित अभयसिंहराजे भोसले तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वागिण विकास व्हावा व त्यांची जगाच्या पाठीवर कुशल अभियंता अशी वेगळी ओळख निर्माण व्हावी, हा हेतु साध्य करण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला जातो. तंत्रशिक्षण घेतल्यानंतर सदर विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी निर्माण करून देण्यामध्ये नेहमीच हे तंत्रनिकेतन सातारा जिल्हयामध्ये अग्रेसर राहिलेले आहे.
याचाच एक भाग म्हणून बुधवारी कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले असून बजाज ऑटो, पुणे या नामांकीत कंपनीच्या एचआरए विभागाचे अधिकारी मुलाखती घेण्यासाठी अभयसिंहराजे भोसले इन्स्टिट येथे उपस्थित राहणार आहेत. या सुवर्णसंधीचा लाभ परिसरातील सर्व डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा, सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले आहे.