दैनिक स्थैर्य | दि. ३० ऑक्टोबर २०२४ | फलटण |
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटणमधील पैलवान, बॉक्सर अभिराज मारुती तरडे या विद्यार्थ्याची वुशू क्रीडा स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय विभाग आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी नांदेड यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शालेय राज्यस्तरीय वूशू क्रीडा स्पर्धेमध्ये श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी पैलवान बॉक्सर अभिराज मारुती तरडे या विद्यार्थ्याने राज्यस्तरावर ६० किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. त्याची तामिळनाडू येथे होणार्या राष्ट्रीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अभिराज तरडे यास ज्ञानेश्वर परदेशी, प्रवीण कुचगावे, निलेश लोखंडे व क्रीडा शिक्षक दशरथ लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
अभिराजच्या यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सचिव समशेरसिंह नाईक निंबाळकर, प्राचार्य रणदेव खराडे, वासुदेव सुपे व शिक्षक यांनी अभिनंदन केले.