दैनिक स्थैर्य | दि. २३ एप्रिल २०२४ | फलटण |
सोनगाव येथे श्री. अभिजीत भोसले यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ व विद्यार्थ्यांना ‘स्पर्धा परीक्षांची तयारी’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सोनगावचे सुपुत्र श्री. अभिजीत भोसले यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल सर्व तरुण मंडळ सोनगाव व समस्त ग्रामस्थ सोनगाव यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्पर्धा परीक्षांची तयारी’ यावर मार्गदर्शनपर व्याख्यान पार पडले. यामध्ये त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी केली व यश प्राप्तीसाठी संघर्ष करायची तयारी ठेवावी लागते आणि ध्येय साध्य करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नवादी राहा, असे सांगितले.
या कौतुक सोहळ्याने गावातील विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. श्री. पोपटराव बुरुंगले यांच्या हस्ते अभिजीत भोसले यांच्या सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर श्री. पोपटराव बुरुंगले, (चेअरमन, सोनगाव वि.का.स. सेवा सोसायटी), सरपंच प्रतिनिधी, श्री. रमेश जगताप, श्री. प्रणव लोंढे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. राजेश निकाळजे यांनी केले.
या कार्यक्रमप्रसंगी बबनराव जगताप, संदीप पिंगळे, संतोष गोरवे, लखन पिंगळे, दिलीप भंडारे, दीपक लोंढे (पो.पाटील), रामहरी पिंगळे (मा. फौजी), राजेंद्र आडके, ज्ञानदेव शेंडे, सचिन शेवते, मल्हारी तोरणे, सुरेश पवार, संतोष मोरे, राहुल गायकवाड, रमेश मदने, गणेश यादव, गणेश कांबळे, अमोल सस्ते, नामदेव शिंदे, कांतीलाल चव्हाण, सुधीर ओव्हाळ, ज्ञानेश्वर लवटे, सुनील यादव, शशिकांत मोरे, अक्षय खांडेकर, मनोज लोंढे, महेश जाधव, निखिल कांबळे व इतर सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन सर्व तरुण मंडळ सोनगाव व समस्त ग्रामस्थ सोनगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.