दैनिक स्थैर्य | दि. ८ जानेवारी २०२५ | फलटण |
पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी फलटण येथील टोळीप्रमुख अभिजीत अरुण जाधव (वय २१) व टोळी सदस्य आकाश भाऊसो सावंत (वय २३ वर्षे, रा. दोन्ही रा. मलटण, ता. फलटण, जि. सातारा) या दोघांना संपूर्ण सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर तालुका, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका हद्दीतून दोन वर्षांकरिता हद्दपार केला आहे.
सातारा जिल्हयामध्ये फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळीप्रमुख अभिजीत अरुण जाधव (वय २१ वर्षे) व टोळी सदस्य आकाश भाऊसो सावंत (वय २३ वर्षे, रा. दोन्ही रा. मलटण, ता. फलटण, जि. सातारा) यांच्यावर फलटण शहर पोलीस ठाणे येथे जबरी चोरी करणे, घरफोडी चोरी करणे, विनयभंग करणे असे गुन्हे दाखल असल्याने फलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हेमंतकुमार शहा यांनी या दोघांच्या हद्दीपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी राहुल आर धस, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण विभाग फलटण यांनी केली होती.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
सदर टोळीतील इसमांचेवर दाखल असलेल्या गुन्हयांमध्ये त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांचा गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. या टोळीमधील इसम हे फलटण तसेच परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांचेवर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्यामुळे फलटण तालुका परिसरातील लोकांना मोठया प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर सर्वसामन्य जनतेमधून कडक कारवाई करणेची मागणी होत होती.
याकामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो. हवा. प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो. कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, फलटण शहर पोलीस ठाणेचे पो. हवा. बापू धायगुडे, सचिन जगताप, पो.कॉ. जितेंद्र टिके यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.