भैरवनाथ क्रिकेट क्लबचे मॅन ऑफ द मॅच अभिजीत चौधर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 1 डिसेंबर 2023 | बारामती | वंजारवाडी येथे भैरवनाथ चषक वंजारवाडी २०२३ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये प्रथम क्रमांक भैरवनाथ क्रिकेट क्लब द्वितीय शिवरत्न विनर्स क्लब तृतीय अकोले क्रिकेट क्लब व चतुर्थ विजय बापू चौधर इलेव्हन क्लब यांनी विजेतेपद पटकाविले. मॅन ऑफ द मॅच अभिजीत चौधर, बेस्ट बॉलर विजय चौधर व बेस्ट बॅट्समॅन अभि चौधर यांनी देण्यात आले.

क्रिकेट वनडे टेनिस सामन्याचा शुभारंभ व बक्षीस वितरण समारंभ वंजारवाडीचे माजी उपसरपंच विनोद चौधर यांच्यासोबत हस्ते करण्यात आला. यावेळी सचिन चौधर, प्रताप गोफने, हरिभाऊ चौधर, आकाश सूर्यवंशी, निलेश शिंदे, राजेंद्र महादेव चौधर, प्रदिप ज्ञानदेव चौधर व या स्पर्धेचे आयोजक विजय भाऊ चौधर उपस्थित होते.

ग्रामीण भागातील खेळाडूच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी व खिलाडू वृत्ती जोपासली जावी आणि ग्रामीण भागातील खेळाडूंनी देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी म्हणून सदर स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करत असल्याचे विनोद चौधर यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!