दैनिक स्थैर्य । दि. १ जुलै २०२१ । सातारा । सोनगाव, ता. सातारा येथील पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातून अज्ञात इसमाने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास सोनगाव, ता. सातारा येथील पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातून अज्ञात इसमाने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार त्या मुलीच्या आईने तालुका पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक फरांदे तपास करत आहेत.