आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार नितीन गडकरी यांना जाहीर

उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांची माहिती


स्थैर्य, सातारा, दि. 13 ऑगस्ट : भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने देण्यात येणारा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार 2025 केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी केली.

प्रमोद शिंदे म्हणाले, केंद्रीय मंत्री गडकरी यांनी देशातील रस्ते, महामार्ग, बंदरे आणि जलमार्ग विकासाच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय, कार्यामुळे संपूर्ण भारतात भौगोलिक, सामाजिक आणि मी आर्थिक परिवर्तन घडवून आणले आहे.

नितीन गडकरी यांनी देशभरात भारतमाला प्रकल्प, सागरमाला योजना, जलमार्ग दे विकास, इलेक्ट्रिक वाहने प्रोत्साहन आणि चहायब्रीड अ‍ॅन्युइटी मॉडेलसारखे महत्त्वाचे प्रकल्प राबवले. यामुळे लाखो युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असून, ग्रामीण व शहरी भागाचा एकसंध विकास साधता आला. त्यांच्या या योगदानाबद्दल यंदाचा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कारासाठी मदत व पुनर्वसनमंत्री व कारखान्याचे अध्यक्ष मकरंद पाटीलं यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाकडून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

एक लाख रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून, कारखान्याचे मार्गदर्शक संचालक खासदार नितीन पाटील यांनी मंत्री गडकरी यांची दिल्ली येथे समक्ष भेटून पुरस्काराबाबत माहिती दिली. हा पुरस्कार प्रदान समारंभ लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!